औरंगाबाद : भिवंडी येथून अमरावतीकडे निघालेले दोनशे मजूरांना काल गंगापूर मध्ये अटक केली. बॉडी बंद वाहनांमधून हे मजूर निघाले होते. बॉर्डर सील असताना हे गंगापूर पर्यंत आलेच कसे? हा चर्चेचा मुद्दा आहे.
या दोनशे मजुरां कडे 10 मोटर सायकली मिळाल्या आहेत. सध्या या दोनशे मजुरांना गंगापूरच्या मुक्तेश्वर महाविद्यालयामध्ये विलगीकरण करून ठेवले आहे. सतर्क पोलीस यंत्रणेमुळे हे मजूर गंगापूरात पकडले गेले. रोजगार नसल्यामुळे आणि हाताला काम नसल्यामुळे हे कामगार भिवंडी तून थेट आपल्या गावी अमरावतीला निघाले होते.
मोटर सायकल वरचे दहा जण आधी जिल्ह्याच्या सीमा मुख्य मार्गावरून ओलांडण्याचा प्रयत्न करीत. जर या मोटरसायकलस्वारांना काही ही अडचण आली नाही. तर ते या दहा मोठ्या बॉडी बंद गाड्या आणायला सांगत होते. काही ठिकाणी मुख्य मार्गावर कडक बंदोबस्त असल्याने स्थानिकांच्या मदतीने छुप्या मार्गाने ते पुढे आले होते.
यापैकी सगळ्यांची तपासणी आज सकाळपासून सुरू केली आहे. त्यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आढळले तर ती संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ करणारी ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

