उस्मानाबाद : गतवर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीकविमा तत्काळ वितरित करावा, या मागणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवावेत, असे आवाहन भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी हक्काच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. सरकारकडून जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अतिवृष्टी झाली, नुकसान झाले, हे सरकारला मान्य आहे. या नुकसानीपोटी अल्प का होईना सरकारने अनुदानही दिले. विरोधकांच्या दबावामुळे विमा कंपनीला विमा देण्याचे पत्रही दिले मात्र विमा कंपनीचा नकार आल्यानंतर सरकार कडून विमा कंपनीवर कसलीही कारवाई करण्यात येत नाही अथवा शेतकऱ्यांना त्यांचा पीकविमा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नसल्याची टीका आ. पाटील यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी कृषी आयुक्त, कृषी सचिव, कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे विमा कंपनी व राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयीन लढाई तर चालतच राहील परंतु जनमाणसातून देखील या विषयावर सरकारवर दबाव वाढविण्यासाठी पीकवमा देण्याबाबत ठरावासह मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याचे आवाहन आ. पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील त्यांच्या मतावर कधीही ठाम नसतात’; ‘वाघासोबतच्या मैत्री’वरून खडसेंची कोपरखळी
- नुकसान भरपाई देण्यास नकार, पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव
- ‘मराठा समाजाला मराठवाड्यात ओबीसीतून आरक्षण द्यावे’, प्रा.प्रदिप सोळंकेंची मागणी
- ‘भाजपच्या यशामागे मोदींचा चेहरा, तेच भाजपचे नेते’, राऊतांनी कौतूक केल्याने भुवया उंचावल्या
- ‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

