Share

पहा, पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रे कोणती ?

Published On: 

पुणे : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात देखील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ झाली आहे. शहरात नव्याने ५० प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली असून एकू ण १०९ प्रतिबंधित क्षेत्रे झाली आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिके कडून प्रतिबंधित क्षेत्राचा दर काही दिवसांनी आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राची सुधारित यादी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केली आहे. त्यामध्ये नव्या ठिकाणांची वाढ झाली आहे. शहरात १७ जूनपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७४ एवढी होती, आता एकू ण १०९ प्रतिबंधित क्षेत्रे झाली आहेत.

हि आहेत प्रतिबंधित क्षेत्रे :
सदाशिव पेठेतील राजेंद्रनगर, मनपा कॉलनी, पर्वती दर्शन परिसरातील चाळ क्रमांक ६७, ७०, ९३, ९९, १०७, साईबाबा वसाहत परिसर, गणेश पेठेतील संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंतचा लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता परिसर, घोरपडी येथील शक्तिनगर परिसर, ढवळे वस्ती, हडपसरमधील सव्‍‌र्हेक्षण क्रमांक २८२, मुंढवा परिसर, अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी परिसर, शाहू कॉलेज रस्ता परिसर, कात्रज परिसरातील अय्यप्पा मंदिरालगतचा परिसर, शिवशंकर कॉलनी, बिबवेवाडी ओटा वसाहत, अपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज परिसर, येरवडा येथील अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, रामनगर, जय जवान नगर, यशवंतनगर, पर्णकु टी पायथा, शनी आळी, गवळीवाडा, हडपसरमधील अण्णा भाऊ साठे वस्ती, लक्ष्मीनगर, संगमवाडी, शिवाजीनगर, वाक डेवाडी, संभाजीनगर, महापालिका वसाहत, खराडीमधील थिटे वस्ती, थिटेनगर, भेकराईनगर, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी येथील चैत्रबन परिसर, एरंडवणे येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसर, कर्वे रस्त्याचा काही भाग, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीजवळील वसाहत, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे बुद्रुक, पौड फाटा, मेगा सिटी, के ळेवाडी, राजीव गांधी वसाहत, डहाणूकर कॉलनी.

सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राची व्याप्तीही वाढली आहे. जुन्या प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेताना १५ क्षेत्रे वगळण्यात आली. तर नव्याने ५० ठिकाणांचा समावेश करण्यात आला. एकू ण ७४ पैकी ९ क्षेत्रांची फे ररचना करून सुधारणा करण्यात आली. सध्या प्रतिबंधित क्षेत्र ६.६९ चौरस किलोमीटर एवढे झाले आहे.

‘सोशल डिस्टेंसिंगचं पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन करु’

नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?

राज्यातील पेट्रोल-डिझेल दरवाढीवरचे खापर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर फोडलं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!