सिंधुदुर्ग : देशभरात आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.
बापरे… ‘या’ अभिनेत्री तब्बल ३६ हजारांचं वीज बिल, ट्विट करत व्यक्त केला संताप
गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीला जनता तोंड देत असताना इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करुन जनतेची खुलेआम लूट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने चालवला आहे असा आरोप विरोधक करत आहेत.
दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.प्रवीण दरेकर सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीवरचे खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं.
‘इंधन दरवाढीचा निर्णय हा पेट्रोल कंपन्या घेत असतात. राज्य सरकार जे कर लावते, त्यामुळे दरवाढ होत असते. भाववाढीचा नीट अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून राजकारण करत आहे.’ असा आरोप दरेकर यांनी केला.
माळावरच बहुजनाच पोरगं पवारांना नडलं , ते तुम्हाला एवढं का झोंबल ?
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात डिझेल-पेट्रोल वरचा व्हॅट कमी केला होता. त्यावेळी इंधनाचे दर कमी झाले होते. पण आता राज्य सरकारने वेगवेगळे कर लावले आहे. जर हे कर कमी केले तर पेट्रोल डिझेल दरवाढ होणार नाही, असा दावा दरेकरांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

