Share

हिंदू सेनेचा इशारा ; शाहीन बागेत जमावबंदी लागू

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली -सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हिंदू सेनेने ट्विट करून 1 मार्च म्हणजेच रविवारी शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्यांना हटवण्यात येईल असं म्हटलं होतं. त्यानंतर आज शाहीन बागेत मोठ्या संख्यने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान,कायदा-सुव्यवस्था राखण्याचा आमचा उद्देश असून, खबरदारी म्हणून मोठया प्रमाणावर आम्ही पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे असे दिल्लीचे सह पोलीस आयुक्त डी.सी.श्रीवास्तव यांनी सांगितले.दिल्ली पोलिसांनी शाहीन बाग परिसरात कोणीही एकत्र जमू नये, तसेच कोणीही आंदोलन करू नये असं नोटीशीतून बजावले आहे. तसेच हा आदेश न मानल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, पोलिसांशी चर्चा केल्यानंतर आता हिंदू सेनेने आपला नियोजित मोर्चा रद्द केला आहे.

 

 

हिंदू सेनेचं नेमकं काय म्हणणे आहे ?

हिंदू सेनेचे नेते विष्णु गुप्ता यांनी दिल्ली पोलीस शाहीन बागेत सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असं ट्विट केलं आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत तेथे सर्वसामान्य लोकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हिंदू सेना 1 मार्च 2020 या दिवशी सकाळी 10 वाजता सर्व राष्ट्रवादींना अडवण्यात आलेल्या रस्ते मोकळे करण्यासाठी आमंत्रित करत आहे असंही हिंदू सेनेने जाहीर केलं होतं.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!