Share

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्या : विभागीय आयुक्त राजाराम माने

Published On: 

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखाण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी कोरोनाग्रस्त रुग्णांची संपर्क साखळी शोधणे व संपर्कातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले. नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी, अर्जुन चिखले, संगिता धायगुडे, प्रतिभा संगमनेरे, आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.

माने म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांच्या दैनंदिन संपर्कात येणारे भाजी विक्रेते, दुध विक्रेते, मेडीकल व किराणा दुकानदार यांची देखील तपासणी करण्यात यावी. यामुळे अधिक प्रमाणात संसर्ग होणे टाळता येईल. कोरोनाग्रस्त रुग्णांवर आदर्श पद्धतीनुसार उपचार करावे, ते संसर्गापासून लवकर मुक्त व्हावे यासाठी रुग्णांची आवश्यक ती सर्व काळजी घेवून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. वैद्यकिय साहित्य व औषधांची कमतरता भासू नये यासाठी नियोजन तयार ठेवावे.

मधुमेह, ह्दय विकार अशा इतर सामान्य आजारांचे रूग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी कोविडसोबतच नॉन कोविड रुग्णालये सुरू राहतील याबाबतची काळजीदेखील जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेमार्फत घेण्यात यावी. गंभीर आजाराच्या रुग्णाला चांगल्या पद्धतीने उपचार देण्यात यावेत. चेकपोस्टवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यकतेनुसार शेडस् उभारण्यात येवून, सॅनीटायझर, मास्क, पिण्याचे पाणी अशा मुलभुत व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

पाचही जिल्ह्यात जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खाजगी रुग्णालयांमधील सुविधा, जिल्ह्यांमध्ये सुरू निर्वासीतांसाठीचे निवारा केंद्रांमधील राहण्याची व जेवणाची करण्यात आलेली व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, अंगणवाडी व त्यामार्फत पुरविण्यात येणारे मिड मिल, प्रधानमंत्री गरीब जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य, भारतीय डाक बँक, अन्नधान्य पुरवठा आदी व्यवस्था यांचा आढावा घेऊन आवश्यकता सूचना यावेळी विभागीय आयुक्तांनी दिल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!