टीम महाराष्ट्र देशा : कोरोना व्हायरसमुळे जगाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. कोरोनामुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोरोनाला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ११९ देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. जगातल्या १ लाख २० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४,५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात जगभरात कोरोनाचे ४,५०० रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, दिल्ली सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेज, ऑफिसेस ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.हा विषाणू पसरू नये त्यासाठी सर्व प्रयत्न दिल्ली सरकार करत आहे. आजच त्याचा आढावा घेतल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं.
एखादा रुग्ण आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी पुरेश खाटा आहेत, हा आजार घालवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही केजरीवाल यांनी केलं आहे.दरम्यान,इटलीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इराणमध्ये आणखी ७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ४२९ झाली आहे.
भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातले ५६ रुग्ण भारतीय तर १७ रुग्ण परदेशी नागरिक आहेत. केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक १७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
