🕒 1 min read
मुंबई : ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी 2020-21 शैक्षणिक वर्षात फीवाढ न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. तसेच आता या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ शिक्षण संस्थांना करता येणार नाही.
याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाची एकूण फी एकरकमी न मागण्याचेही निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षणमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी केली होती.
दरम्यान, अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
