Share

कामाचे पैसे द्या असे म्हणत, ड्रायव्हरची गाडी मालकाला बेदम मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : तुमच्याकडे केलेल्या कामाचे पैसे द्या असे म्हणत तीन जणांनी एकनाथ अर्जुन जाधव (वय ३२,रा.वडगाव-कोल्हाटी) यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना २३ जुलै रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर जाधव हे एकनाथ जाधव यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला होते. किशोर यांनी एकनाथ यांना बाकी असलेल्या पैस्यांची मागणी केली. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आकाश आणि एक इसम सोबत होता. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली.

त्यानंतर आकाश जाधव याने त्याच्या सोबत लाकडी दांडा आणला होता. त्या दांड्याने बाकी असलेले सहा हजार रुपये मागत तिघांनी एकनाथ जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी किशोर जाधव, आकाश जाधव यांच्यासह साथीदाराविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!