🕒 1 min read
मुंबई : गेल्या एक वर्षभरापासून देशभरात सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले होते. मात्र कालांतराने सर्व प्रगतीपथावर परतले आहे. यातच बॉलीवूडमध्येही बंद पडलेले आणि रखडलेले प्रोजेक्ट मार्गी लागत आहे. नुकतेच बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आपला आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरचे काही फोटोज त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार भावूक झाला होता. सेटवरील दिल्लीतील प्रसिद्ध चांदनी चौकचं रिक्रीएशन पाहून त्याने दिल्लीतल्या आठवणींना उजाळा दिला. याचे काही फोटो त्याने सोशल मिडियावर शेयर केले आहेत. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/CSGmR3nNDGu/?utm_source=ig_web_copy_link
हे फोटोज शेअर करताना अभिनेता अक्षय कुमारने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे की, ‘चांदनी चौकच्या रस्त्यावर चालणं खूप मिस करत होतो. पण मुंबईत माझ्या चित्रपटाच्या टीमने इतकं सुंदर सेट बनवलं की ते पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चित्रपटाच्या सेटवर हुबेहुब दिल्लीतील चांदनी चौक बनवलं होतं. सुमित बासु तुम्ही बनवलेला हा सेट अगदी खराखुरा चांदनी चौक वाटत आहे. माझ्यासोबतची शानदार को-स्टार भूमी पेडणेकर हिने देखील आपल्या टॅलेंटने संतुलन राखल्याबद्दल तिचे सुद्धा खूप आभार.’
पुढे तो म्हणतो, ‘आनंद सर, तुमच्याबद्दल काय बोलू शकतो? तुम्ही एक जादूगार आहात आणि आज जे आपण रक्षाबंधन चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतोय, मला जाणीव होते की यातून मी एक उत्तम कलाकार बनून हा सेटचा निरोप घेत आहे’, असे म्हणत अक्षयने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बहिण आणि भावाच्या नात्यावर आधारीत ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय हे करत आहे. तर या चित्रपटात अक्षयसोबत भुमी पेडणेकर आहे. आनंद एल राय यांच्यासोबत अक्षयने यापुर्वी ‘अतरंगी रे’ हा चित्रपट केला होता. ‘अतरंगी रे’चे चित्रिकरण पुर्ण झाले असुन तो प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षयसोबत सारा अली खान आणि धनुष हे कलाकार असतील.
महत्वाच्या बातम्या
- ‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध
- मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती
- ‘राज्यपालांना वाटतंय ते अजूनही मुख्यमंत्रीच आहेत’ ; मलिकांचे राज्यपालांवर टीकास्त्र
- भारतात अद्याप शाळा सुरु होणार नाहीत ; नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी व मुलांसोबत दुबईत शिफ्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

