Share

पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात पहिले

Published On: 

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमधे सातवा क्रमांक पटकावला. मानांकनाचा ताजा अहवाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सातवा तर पारंपारिक विद्यापीठांमध्ये ते देशात संयुक्तरीत्या पहिला क्रमांकावर आहे. वरच्या सहा संस्थांमध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस आणि पाच आयआयटी यांचा समावेश आहे.

‘टाइम्स हायर एज्युकेशन’ यांच्या वतीने जगभरातील उच्चशिक्षण संस्थांच्या दर्जाचे मानांकन केले जाते. त्यानुसार पहिल्या १००० विद्यापीठांची नावे जाहीर केली जातात. त्यात प्रामुख्याने अध्यापन, संशोधन, ज्ञानप्रसार, आंतरराष्ट्रीय भान असे निकष पाहिले जातात. हे मानांकन जगभरात प्रतिष्ठेचे मानले जाते. या संस्थेने २०१८ साठीची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रगती केली आहे.

गेल्या वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशलन रँकिंग फ्रेमवर्क’ने जाहीर केलेल्या (एनआयआरएफ) क्रमवारीत विद्यापीठाचा दहावा क्रमांक आला होता. आता विद्यापीठाने आणखी प्रगती केल्याचे ‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याच मूल्यांकनात देशातील पारंपारिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०१६ मध्ये तिसरा, तर २०१७ मध्ये दुसरा क्रमांक आला होता. त्यात सुधारणा होऊन आता २०१८ साठी विद्यापीठाने संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. विद्यापीठाला गेल्या वर्षी २७.५ गुण होते. त्यात वाढ होऊन यावर्षी ३०.६ गुण मिळाले आहेत. तसेच, अध्यापन, उद्योगांसोबतची मिळकत, सायटेशन या निकषांमध्येही विद्यापीठाने यावर्षी प्रगती साधली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देशात संयुक्त सातवा क्रमांक मिळाला, ही खूप आनंदाची बाब आहे. गेली दोन-तीन वर्षे आम्ही विविध बाबतीत सुधारणा करत होतो. त्याचेच हे फलित आहे. आम्ही योग्य दिशेने काम करत आहोत, हे या अहवालातूनही पाहायला मिळाले आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!