मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
या संदर्भात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट केलं आहे. हे ट्विट सेव्ह करा म्हणत मोहित कंबोज यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचा इशारा दिला आहे. यापुर्वी मुरजी पटेल एकनाथ शिंदे गटाकडून लढणार होते. मात्र, आता त्यांचा पक्ष निश्चित झाला आहे. भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना झाल्यास ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळेल, असं भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाटत होतं. त्यामुळेच मुरजी पटेलांना शिंदेंच्या पक्षाकडून रिंगणात उतरवून शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत घडवून आणण्याची रणनीती असल्याच्या चर्चा होती. मात्र, आता मुरजी पटेल (Muraji Patel) भाजप कडून लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.
“हे ट्विट सेव्ह करा, अंधेरी पूर्व आमदार निवडणुकीत #BJP विक्रमी फरकाने विजयी होणार !’ अशा आशयाचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मोहित कंबोज यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. भाजपकडून नेमकी काय रणनीती आखण्यात आली आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Save This Tweet :-
Andheri East MLA By Election #BJP Will Win By Record Margin !@BJP4Maharashtra @BJP4Mumbai
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) October 14, 2022
दरम्यान, मुरजी पटेल यांचा यापुर्वी पराभव झाला होता. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती. शिवसेनेतर्फे रमेश लटके येथे उभे होते. त्यावेळी मुरजी पटेल यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी पटेल यांचा पराभव झाला होता. आता पटेल यांनाच रमेश लटकेंच्या पत्नीविरोधात उभं केल्यानंतर २०१९ ची पुनरावृत्ती होणार कि मोहित कंबोज यांचं भाकीत खरं ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता
- Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील ; राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया
- Eknath Khadse | “रश्मी शुक्ला जेव्हा फडणवीसांना भेटल्या तेव्हाच त्यांना…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
- Gold Silver Price Update | या सणासुदींच्या दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीत वाढ, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे भाव
- Girish Mahajan । “मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय”; व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

