🕒 1 min read
पुणे : ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची दोन आठवड्यांपूर्वी तडकाफडकी बदली केल्यानंतर आता अधिष्ठातापद हे रिक्त आहे. त्यामुळे या पदावर लवकरात लवकर कोणीतरी नियुक्त करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवार 16 एप्रिल रोजी राज्य शासनाने बदली केली होती. सध्या त्यांचा पदभार रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी अधिष्ठातापद लवकर भरावे अशी मागणी केली आहे.
सर्वसामान्य रुग्ण हे उपचारांसाठी ससून रुग्णालयावर अवलंबून असतात. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ससून रुग्णालयावरील ताण वाढलेला आहे. ससूनच्या नवीन इमारतीला कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या ठिकाणी दाखल केलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सक्षम अधिकार्याची तातडीने गरज असल्याचे मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.
डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर ससूनमधील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोधैर्य खचल्याचा दावाही मुळीक यांनी केला आहे. ‘या सर्वांनी याविषयीच्या भावना कृतीतून आणि पत्र लिहून सरकारकडे व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घ्यावा’ असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
