नागपूर : देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात होणार आहे. या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच ४५ वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे. आता सरकारी रुग्णालयांसोबतच काही खाजगी रुग्णालयांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
देशात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ०१ मार्चपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री यांनी कोरोना लस घेतली आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी कोरोना लस घेतली. नागपूर येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये मोहन भागवत आणि सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
एक मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “तू नेहमीच स्वस्त राहशीलस आणि…” ; कंगनाचा तापसीला उपरोधित टोला
- राज्यातील अनेक मंहत आज साष्टपिपंळगावात; आंदोलनाचा ४६ वा दिवस
- थर्माकोलवरुन तलाव पार करणाऱ्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
- ‘आज इंदिरा गांधींची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली’
- ‘…इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं ; अनुपम खेर यांनी घेतली ‘सोनी मॅक्स’ची फिरकी


