अहमदनगर : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज अहमदनगर येथील एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं, तर शिवसैनिकांना बळ दिलं. ‘शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल,’ असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
‘वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल,’ असं राऊत म्हणाले. तर, नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असं देखील त्यांनी नेत्यांसह शिवसैनिकांना बजावून सांगितलं. पुढे ते म्हणाले, शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत.
राऊत राणेंना उद्देशून म्हणाले, ‘कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच’
‘संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असं राऊत म्हणाले. तर, ‘तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही,’ असा टोला राऊतांनी राणेंना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा
- भगत सिंह नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना मुलाला लागला गळफास
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला

