Share

शरद पवार हे ‘जाणता राजा’च, संजय राऊतांनी मिसळला आव्हाडांच्या सुरात सूर

Published On: 

पुणे : भाजपच्या एका नेत्याने ‘कल के शिवाजी आज के मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे भाजप कार्यालयात प्रकाशन केले. यावरून संपूर्ण देशात भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे भाजपकडून शरद पवार यांना लक्ष केले जात असून शरद पवार यांना जाणता राजा संबोधण्यावर भाजपने आक्षेप घेतले आहे. दरम्यान यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे जाणते राजाच आहे असे म्हटले आहे.

राज्याची संपूर्ण माहिती ज्यांना आहे त्यांनाच जाणता राजाच म्हटले जाते. शरद पवार यांच्या नावामुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात आहे असे म्हणत राऊत यांनी शरद पवार हे जाणता रजेच आहे असे म्हटले आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जनतेने शरद पवारांना जाणता राजा उपाधी दिली आहे असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, शरद पवार हे निश्चितपणे जाणते राजे आहेत. जनतेने त्यांना ही उपाधी दिली आहे. तशीच महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेनं त्यांना राजा मानलं. लूटमार करणारा राजा होत नाही, रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कुणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करतो, तो जाणता राजा असतो. त्यामुळे कुणीही त्यावर कुणी आक्षेप घ्यायची गरज नाही.

दरम्यान, याच कार्यक्रमात संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केल्यावरून वाद पेटला होता. भाजपने केलेल्या या प्रकारावर आता छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे आणि खुर्च्या सोडाव्यात, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी पवारांच्या बिन पट्ट्याचा कुत्रा, अशा शब्दांत राऊतांचे नाव न घेता टीका केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!