Share

Sanjay Raut | संजय राऊतांना एकनाथ शिंदेंच्या द्वेषाचा कावीळ ; शिंदे गटाची खोचक टीका

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. मात्र असं असतानाही उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश जोरात प्रवेश सुरु आहेत. नाशिकच्या ११ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय राऊत यांनी या नगरसेवकांवर खोचक टीका केली आहे.

महाराष्ट्रातून जी लोकं शिंदे गटात सामील झाली आहेत, एकतर ती दलाल आहेत. दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. या सगळ्यांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे.

शितल म्हात्रे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील महाज्ञानी माननीय संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार आहेत. त्यांनी रेडे, प्रेत अगदी महिला आमदारांना वेश्या इथपर्यंत म्हटलं. गद्दार तर म्हणतच होते. आज त्यांना नवीन शब्द सुचले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये नाशिक मधले नगरसेवक यांनी प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर त्यांना काळे धंदे करणारे, दलाल, जुगार खेळणारे अश्या अनेक नावाने  संबोधलेलं आहे. आमदार, नगरसेवक जेव्हा तुमच्याकडे असतात. तेव्हा ते धुतल्या तांदळाचे असतात का तसेच संजय राऊतांना एकनाथ शिंदेच्या द्वेषाची इतकी कावीळ झालेली आहे का ?”

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!