मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मधून या दोन वर्षांतील राजकीय बदल सांगितले आहेत. तसेच भाजपावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील ४५ आमदार फोडल्याशिवाय भाजपला सत्ता पलटविण्याचा डाव यशस्वी होणार नाही व ते आतापर्यंत एकही आमदार गळाला लावू शकलेले नाहीत. पंढरपूरची पोटनिवडणूक गफलतीमुळेच राष्ट्रवादी हरली व देगलूरच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी उभे केलेली तटबंदी भाजपास तोडता आली नाही. उत्तर गुजरातच्या सीमेवरील दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक जिंकून शिवसेना परतली. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. त्यात महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली आहे. दोन वर्षांत विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावली. कारण राष्ट्रीय स्तरावरही जनतेच्या हिताच्या कोणत्याही मुद्द्यावर भाजपने महाराष्ट्राचा आवाज उठवला नाही. नोटाबंदी, कोरोना व्यवस्थापनातील अनागोंदी, तीन कृषी कायदे हे जणू ईश्वरी वरदानच आहे अशा थाटात ते वागले. नोटाबंदी फसली. तीन कृषी कायद्यांबाबत मोदी यांना माघार घ्यावी लागली. कोरोना काळात निर्माण केलेल्या ‘पीएम केअर फंडा’तील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर भाजपचे ऑडिटर जनरल श्री. किरीट सोमय्या बोलायला तयार नाहीत. हे ढोंग आहे. त्या ढोंगाचे वस्त्रहरण झालेच आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आजही महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य गणले जाते. याचे कारण इथे आजवर राजकीय स्थैर्य नांदत आले आहे. इथल्या कामगारांची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत वरच्या दर्जाची आहे. जनताही तुलनेत सुशिक्षित व आधुनिक विचारांचा स्वीकार करणारी आहे. इथली शासकीय यंत्रणा कार्यक्षम आहे आणि तिचा दृष्टिकोन आधुनिक व विकासोन्मुख आहे. ही सर्व व्यवस्था सरकारे आली व गेली तरी कायम असते. ती तशीच राहायला हवी. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हे सर्व मोडून पडेल असे वागणे सोडायला हवे. फडणवीसांचे पहाटेचे राजकारण 72 तासांत आटोपले. त्यास दोन वर्षे झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सोहळय़ाला दोन वर्षे होत आहेत.’ तसेच कोणी काय कमावले व गमावले यापेक्षा राज्य किती पुढे गेले ते महत्त्वाचे, असेही राऊत लेखाच्या शेवटी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

