Share

बिहारमध्ये कॉंग्रेसच्या गचाळ कामगिरीमुळे महागठबंधन पराभवाच्या छायेत

Published On: 

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी १२.३० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

दरम्यान,बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदल गेले. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत आघाडी घेतली. यात ७३ ठिकाणी भाजपा आघाडीवर आहे. तर जदयू ४९, व्हीआयपी ५ व हम एका जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. राजदचे ६७ उमेदवार आघाडीवर आहेत.सध्या काँग्रेसने २०, तर डाव्यांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमतांसाठी १२२ जागांची आवश्यकता असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, अंतिम निकालानंतर हेच चित्र कायम राहणार का हा प्रश्न आहे.

दरम्यान, या निवडणुकीत महागठबंधन सध्या पराभवाच्या छायेत आहे. यासाठी आता कॉंग्रेस जबाबदार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे . बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए १२९ जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ७३, जेडीयू ४९, हम २ आणि व्हीआयपी ५ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी १०३ जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल १४४, काँग्रेस ७० तर डावे पक्ष २९ जागांवर निवडणूक लढवत होते.

आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये १४४ जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला ६५ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २९ जागा लढवणाऱ्या डाव्या पक्षांनी १८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर ७० जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान याबाबत खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. कॉंग्रेसने जर अधिक चांगली कामगिरी केली असती तर तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्री झाले असते असं म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!