Share

अवघा देश चिंतेत असताना संजय राऊत मोदींवर टीका करण्यात व्यस्त,म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्ये लॉकडाऊन झाले आहेत. परंतु जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक लोक लॉकडाऊनला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरा बाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं आहे. मात्र, याचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला. देशभरातील जनता कर्फ्यू हटल्यानंतर मुंबईकर रस्त्यावर उतरलेले दिसले. सकाळी 9 वाजच्या सुमारास मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्यावरुन वाहनांना मुंबईच्या दिशेनं तात्काळ सोडण्यात आलं. असंच चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.

“अनेक लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आदेशांचं गांभीर्याने पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावं” असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान,एका बाजूला हे सर्व सुरु असताना खा. संजय राऊत मात्र राजकारण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे लोकं घाबरले असताना तुम्ही त्याला उत्सवाचे रूप दिले असा आरोप राऊत यांनी मोदींवर केला आहे. जर सरकार गंभीर नसेल तर जनता देखील गंभीरपणे या समस्येकडे पाहणार नाही असं राऊत यांनी म्हटलं .

दरम्यान,राज्यात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असून १४४ कलम लागू केले असताना लोकं घरामध्ये बसत नाहीत याचा अर्थ कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. गृहविभाग सांभाळणाऱ्या आपल्या मित्रपक्षातील नेत्याची संजय राऊत कानउघडणी करणार का ? हा देखील सवाल उपस्थित होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!