Share

निवडणूक आयोगाचे आभार ! आता राजकीय अनिश्चितेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल : राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निवडणूक आयोगाकडून मोठी बातमी आली आहे. कोरोनामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी  रखडलेल्या  निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतचा प्रस्ताव टाकला होता. यावर आता निवडणूक आयोगानेही हालचाल केली आहे.

यावर शिवसेना खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे.  या मुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चितेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल.महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला. केंद्र सरकारचे आभार ! असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांवर निवडणुका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील 9 विधानपरिषद जागांवर प्रलंबित असलेल्या निवडणुकांशी संबंधित बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राच्या मुद्यावर निवडणूक आयोगाची दिल्लीत मोठी बैठक सुरू होती. या बैठकीत अमेरिकेवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त सामील झाले होते. दोन्ही निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगात हजर होते.

दरम्यान, विधानपरिषदेच्या या 9 जागांसाठी 27 मे रोजी निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!