Share

मुंबईहून आलेल्या पाहुण्यामुळे सांगली महापलिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव

Published On: 

सांगली : काही दिवसांपूर्वी मुंबईहून सांगलीतील दुधेभावी या गावी एक पाहुणा आला. हा पाहुणा कोरोनाबाधित होता. त्यानंतर याचा संसर्ग त्याच्या पत्नीला देखील झाला. त्यानंतर या पती-पत्नीच्या संपर्कात आलेल्या आणि सांगली महापालिका क्षेत्रातील कुपवाड भागातील वाघमोडे नगर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीलाही कोरोना लागण झाली. ही मुलगी कोरोनाबाधित रुग्णाच्या मेहुणीची मुलगी आहे. त्यामुळे आता मुंबईहून आलेला पाहुणा चांगलाचं महागात पडला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी आणि नोडल ऑफिसर डॉ.संजय साळुंखे माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सध्याच्या घडीची कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची संख्या 6 वर गेली आहे. महापालिका क्षेत्रातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे. कोरोनाबाधित ठरलेल्या दुधेभावी येथील व्यक्तीशी संबंधित दोन जणांचे अहवाल काल प्रलंबित होते. सदर अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आहे. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील 28 पैकी 25 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत. यामध्ये कोरोना बाधितांच्या एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र पत्नीचा आणि यांच्या संपर्कात आलेल्या एका मुलीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान मुंबईहून आलेला पाहुणा हा मुंबईच्या मानखुर्द या ठिकाणी वास्तव्यास होता. तो 27 एप्रिल रोजी आपल्या मामाच्या गावी म्हणजे दुधेभावी येथे पत्नी व दोन मुलांसह सोलापूर मार्गे आला. त्यानंतर 28 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या फिवर क्लिनिक तपासणीमध्ये कोरोना लक्षण असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर तातडीने प्रशासनाने ‘त्या’ व्यक्तीला ताब्यात घेऊन मिरजच्या आयसोलेशन कक्षात दाखल केलं होतं.

त्या व्यक्तीचे स्वॅब घेतल्यानंतर गुरुवारी ‘त्या’व्यक्तीला कोरोना लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर प्रशासनाने अधिक गतीने काम करत त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी मुलांसह दुधेभावी, कुपवाडच्या बामणोली आणि त्याच्या मुळगाव असणाऱ्या येडेनिपाणी येथील 28 जणांना क्वारंटाईन करून स्वॅब घेतले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!