🕒 1 min read
नाशिक : जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना विषाणू कोविड-19 ही जागतिक साथ घोषित केल्याचे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत केलेले अभिप्राय लक्षात घेता आणि मुख्य वन्यजीवररक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई यांचेकडील निर्देशनुसार नाशिक विभागातील अभयारण्य 1 मे 2020 ते पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत, असे वनसंरक्षक (वन्यजीव) अ. मो. अंजनकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
नाशिक विभागातील कळसुबाई हरिश्चंदग्रड वन्यजीव अभयारण्य (जि.अहमदनगर), नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जि.नाशिक, अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य जि.धुळे व यावल वन्यजीव अभयारण्य जि.जळगांव या अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थ व पर्यटकांची सुरक्षा व आरोग्याच्या दृष्टीने ही अभयारण्ये 1 मे 2020 ते पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील.
वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या वनपरिक्षेत्रातील परिमंडळ नियत क्षेत्रामध्ये संबंधित कर्मचारी उपस्थित राहतील, याची व्यक्तीश: दखल घ्यावी, तसेच या दरम्यान पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश बंद करावा, याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यटकांना आवाहन करावे, असेही अंजनकर यांनी कळविले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

