🕒 1 min read
Sambhajiraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर भाजप पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील त्यांना साथ दिली. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील त्रिवेदींची पाठराखण केली. यावरुन संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.
या राज्यपालांना महाराष्ट्रात ठेऊ नका. पंतप्रधानांना वाटत असेल त्या राज्यात त्यांनी कोश्यारींना पाठवावं. पण कोश्यारींना लवकरात लवकर महाराष्ट्राबाहेर काढावं तसेच त्रिवेदीला माफी मागायला लावावी, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
याबाबत उदयनराजे भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कसला तो थर्ड क्लास भिकारडा. त्या त्रिवेदीला बाहेर काढा. नाही तर मी माझ्या पद्धतीने बघून घेईल, त्यांची जीभ कशी हासडायची हे मला माहीत आहे, असा संतप्त इसारा उदयनराजे यांनी दिला आहे.
प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यापालाच पद सन्मानाच पद आहे. त्यांना आपण काय बोलावं हे कळायला पाहिजे. त्यांनी एकदा नव्हे दोनदा विधान केलं, असं उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Amey Khopkar | “मल्टिप्लेक्स चालक नालायकपणा करतात”; अमेय खोपकर यांचे खोचक वक्तव्य
- Udayanraje Bhosale | “कसला तो थर्ड क्लास…”, उदयनराजे भोसले त्रिवेंदींवर संतापले
- Keshav Upadhye | “बाळासाहेबांच्या नावाशिवाय स्वकर्तृत्वावर काहीच करता येत नाही त्यांनी…”; भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल
- Sushma Andhare | सुषमा अंधारे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा
- Chitra Wagh | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

