🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या पर्यायवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. सगळे ‘देव’ सध्या ‘लॉकडाऊन’ आहेत. कारण प्रत्येक धर्म आणि धार्मिक स्थळे (मंदिर) हे माणसांवर अवलंबून आहे. त्यांचा पैसा ‘मंदिर, मज्जित आथवा चर्च’ यांच्या तिजोरीत जातो. जर माणसं जिवंत राहिली तरच मंदिर मज्जित, चर्च किंवा गुरूव्दार यांना किंमत येईल… अन्यथा या कोरोना’च्या महामारीमुळे सर्व बेचिराख होईल. कदाचित मंदिरांवर जगणाऱ्याच्या पोटात पोटसूळ उठेल. मात्र सरकारने माणसं जिवंत ठेवली पाहिजेत. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून संकटाच्या काळात राज्यासह देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीय करण करून तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा. हीच संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत मागणी राहिलेली आहेत.
सरकारने आज इतिहासाची प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही शत्रूला हात लावू दिला नव्हता. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा शेतसारा माफ केला होता. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. स्वराज्यात प्रत्येकाचा संरक्षण महाराजांनी केलं होतं. ‘छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी केली होती.’ आर्थिकदृष्ट्या गरीब दीन दलित व बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांची ओळख होती. बहुजनांच्या मुलांची शैक्षणिक कुवत वाढावी व सर्वांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व मंदिरांचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. हीच आजच्या काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उशिरा बोलले मात्र खरं बोलले.’ आम्ही संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून गेली १५-२० वर्षापासून सतत पत्रव्यवहार करून सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. पुरुषोत्तम खेडेकर यांच्यापासून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला किंवा संकटाच्या काळात (अधिवेशन असो किंवा आंदोलन अथवा जयंती) वेळोवेळी मागणी करत आलेला आहे.
सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टची नोंदी सरकारकडेच झालेली आहे. सर्व धार्मिक स्थळे व ट्रस्ट ‘धर्मदाय आयुक्तांच्या’ अंतर्गत येतात. महाराष्ट्र सरकारने राज्यात KG to PG पर्यंतचे शिक्षण दर्जेदार सर्वांना सक्तीचे व मोफत करून सर्वांसाठी खुले करावे आणि सर्वांनी राज्यातील सर्वांच्या आरोग्यासाठी ‘सर्व धार्मिक स्थळांचा पैसा सरकारने समाजहितासाठी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वापरलाच पाहिजे… अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
