Share

Sambhaji Bhide | महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; “आधी कुंकू लाव, मगच…”

Published On: 

Sambhaji Bhide | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. अशातच आता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर संभाजी भिडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली.

शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं म्हंटलंय. त्यांच्या या वक्तव्याचा महिला आयोगाकडून निषेध केला जात आहे.

संभाजी भिडे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले. हे वक्तव्य करून संभाजी भिडे पुढे चालू लागले. त्यानंतही या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र भिंडे यांनी महिला पत्रकाराशी बोलण्यास अखेरपर्यंत नकारच दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!