Share

‘दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते हे बशरम, नालायक आहेत’ 

Published On: 

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दुर्गामाता दौडीला परवानगी नाकारल्याने संभाजी भिडे हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले. यावरुन संभाजी भिडे म्हणाले, दारूची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते हे बशरम, नालायक आहेत असं भिडे यांनी म्हटले आहे.

दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी नाकारली आणि हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यावर 21व्या दिवशी महसूल वाढावा म्हणून राज्यातील सर्व दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देतात. आम्हाला दुर्गामाता दौड करण्यास परवानगी नाकारतात. हे बेशरम आणि नालायक राज्यकर्ते आहेत असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोना हे थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची वस्ती असती. तर सबंध देशाचं नेतृत्व करणारे ठरले असते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!