🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सलमानने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सिने सृष्टीत त्याची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होत असते. सद्या ‘टायगर-३’ या सलमानच्या आगामी सिनेमामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा होत आहे. नुकतेच या चित्र पटा साठी घेत असलेली मेहनत एका व्हिडिओद्वारे समोर आली आहे.
https://www.instagram.com/p/CRjqfvtlIlh/?utm_source=ig_web_copy_link
नुकताच सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या तो जीममध्ये वर्कआउट करताना दिसतोय. हा व्हिडीओत शेअर करत त्याने लिहिले की, ‘मला वाटतंय ही व्यक्ती ‘टायगर ३’ साठी ट्रेनिंग घेत आहे.’शिवाय या व्हिडीओत ‘टायगर जिंदा है’चं म्युझिक ऐकू येत आहे. सलमानची मेहनत पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
‘टायगर ३’ या सिनेमात पुन्हा एकदा सलमान खान एजंट अविनाश सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा जोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय सलमान खानसोबत अभिनेता इमरान हाश्मीइची देखील विशेष भूमिका असणार आहे. सलमानच्या या चित्रपटासाठी त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड उत्सुक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी
- ‘दाल में कुछ काला है; ज्यांचे फोन टॅप केले त्यांनी कोणतं देशविरोधी कृत्य केलं ते जाहीर करा’
- ‘पालकमंत्री बदला, सांगलीला वाचवा’, निलेश राणेंचा जयंत पाटलांविरोधात नारा
- राज कुंद्राच्या अटकेनंतर कंगनाचा पुन्हा एकदा बॉलीवूडवर निशाणा
- ‘केंद्रावर दावा दाखल करण्याआधी राज्य सरकारने किती ऑक्सीजन प्लांट उभे केले हे जाहीर करावे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
