टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अंधेरीच्या न्यायालयात सलमानविरोधात मारहाण आणि दरोड्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी दरोडा, हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
सलमान खान डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता, त्यावेळी एका व्यक्ती त्याचा पाठलाग करत व्हिडिओ बनवत असल्याने त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच शिवीगाळ केली असा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला आहे.
Mumbai: A criminal complaint has been filed against actor Salman Khan by one Ashok Pandey before Metropolitan Magistrate Court, Andheri, for robbery, assault, criminal mischief & criminal intimidation.
— ANI (@ANI) June 25, 2019
दरम्यान, सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. ३२३, ३९२, ४२६, ५०६, आणि ३४ या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आला असून १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती पांडे यांच्या वकिलांनी दिली आहे.


