Share

#पुन्हानिवडणूक? ट्विटवर सईचे स्पष्टीकरण, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सत्ता स्थापनेसाठी राज्यातील प्रमुख पक्षांपैकी तीन पक्ष प्रयत्न करत असतानाच अचानक मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विटवर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले होते.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. तसेच सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी या #पुन्हानिवडणूक? इतकंच ट्विट केलं होत. #पुन्हानिवडणूक हॅशटॅगवर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच #पुन्हानिवडणूक हॅशटॅगवर सई ताम्हणकरने स्पष्टीकरण दिले आहे. ”आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच,’ असे ट्विट करून #पुन्हानिवडणूक? हॅशटॅगवर सईने स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटून गेले तरी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले नाही. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकी आणि चर्चांचे सत्र सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195572566670229504?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195571503728693249?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!