अहमदनगर:- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुर्हूतावर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
दरम्यान आता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुख्य म्हणजे भाविकांच्या वाढत्या आकड्यामुळं मंदिराला येणाऱ्या देणगीतही मोठ्या प्रमाणता भर पडत असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊन काळापुरतं मंदिर बंद ठेवल्यानंतर पुन्हा एकदा शिर्डीच्या दिशेनं भाविकांची रिघ सुरु झाली आहे.
दरम्यान, आता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या वतीनं तब्बल ०८ लाख ३४ हजार रुपये किंमतीची थार या श्रेणीतील गाडी देणगी स्वरुपात दिली आहे. याप्रसंगी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकारा यांनी संस्थानचे प्रमुख कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सदर गाडीची चावी सुपूर्त केली.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- पवित्र जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रात तीनचाकी सरकार स्थापन झालं – अमित शाह
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

