टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष फळबाग शेतकऱ्यांवर झाला आहे. द्राक्षाची निर्यातीची बाजारपेठ असलेला युरोप आणि अमेरिका येथेही कोरोनाने थैमान घातल्याने निर्यात ठप्प झाली आहे. तर वाहतुकीच्या सुविधा मिळवताना येणाऱ्या अडचणी आणि घटलेली मागणी यामुळे द्राक्ष शेतकरी अडचणीत आला आहे.
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी शेतकर्यांना सुचवले तीन पर्याय –
यावरच आता द्राक्ष उत्पादकांसाठी नाशिक स्थित सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी तीन पर्याय सुचवले आहेत. कोरोना संकटामुळे राज्यातील द्राक्षशेतीवर अभूतपूर्व संकट आले आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत काय करता येईल, या अनुषंगाने मराठी वृत्त वाहिनी ‘एबीपी माझा’ने सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यात त्यांनी शेतकर्यांना तीन मुख्य पर्याय सुचविले आहेत –
१) शिल्लक असलेल्या द्राक्षांपासून बेदाणा करणे व त्यातून तोटा भरुन काढण्याचा प्रयत्न करणे.
२) द्राक्ष हंगामाचे एप्रिल व मे हे दोन महिने बाकी आहेत. ज्या शेतकर्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या बागांची काढणी १५ ते २० दिवस लांबवणे.
३) ज्या ठिकाणी द्राक्षे साठवणुकीची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी काढणी केलेली द्राक्षे साठवून ठेवणे.
हे उपाय करून खर्चाचा काही भाग आपण वसून करू शकू. याघडीला शक्य होईल तेवढा तोटा कमी करण्यावर आपला भर असला पाहिजे असही त्यांनी म्हटलं आहे.
(हे उपाय दि. ३ एप्रिल २०२० रोजी असलेल्या स्थितीला अनुसरून आहेत. आगामी ८-१० दिवसांमध्ये परिस्थिती बदलली तर या उपायांमध्ये बदल होऊ शकतो)
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

