टीम महाराष्ट्र देशा: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभेच्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, साध्वीने काही दिवसांपूर्वी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. साध्वीच्या विधानानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे, दरम्यान, कधीकाळी करकरे यांचे सहकारी राहिलेले निवृत्त एसीपी रियाझ देशमुख यांनी साध्वीच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
रियाझ देशमुख हे मुळचे महाराष्ट्रातील औरंगाबादचे रहिवाशी आहेत. हेमंत करकरे 1988 मध्ये अकोल्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी रियाझ देशमुख वाशिम पोलीस स्टेशनचे प्रमुख होते. करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तपास करुन प्रज्ञासिंह यांना तुरुगांत टाकले होते. त्यामुळे आकसापोटी साध्वी प्रज्ञासिंह करकरे यांच्यावर आरोप करत असल्याचं रियाझ देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
साध्वी प्रज्ञासिंहचे वादग्रस्त विधान
मुंबईवर हेमंत करकरेंना मी शाप दिला होता. माझ्या शापामुळेच त्यांचा सर्वनाश झाला, असे वादग्रस्त विधान मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंहने केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
