Share

‘ठाकरे सरकारलाच कोरोना झालाय सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत’

Published On: 

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेलं आहे. या सरकारलाच कोरोना झाला असून सरकारमधील सर्व मंत्री क्वॉरंटाईन झालेत. यांना शेतकऱ्यांचे देणं-घेणं नसल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.

लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपुढे शेतकरी हतबल झाला असून सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. ‘गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा दर कमी मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल’ असा इशाराही खोत यांनी दिला.

राज्य सरकारने सध्या राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये केवळ राजकीय स्वार्थ आहे. गावातील एका .योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी योग्य व्यक्तीची निवड करताना कोणत्या थर्मामीटरचा शोध लावला आहे, असा उपरोधीक टोलाही लगावला. सरकारने प्रशासकाची नियुक्ती न करता आहे त्याच सरपंचाना मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली.

महत्वाच्या बातम्या-

भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!