मुंबई : मजुरांच्या प्रश्नावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारला आणि लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले आहेत. निवडणुकीच्या वेळेस याच मजुरांना तुम्ही गावात आणण्यात सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात. मात्र आता त्यांना गावात येऊन दिले जात नाही. एकीकडे परदेशातील भारतीय नागरिकांना विमानाने आणले जात आहे. मात्र मजुरांना बस, रेल्वेची सेवा तीही बरोबर नाही, अशी दुय्यम वागणूक सरकार का देत आहे ? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.
सदाभाऊ म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरातील मजुरांना गावी परतण्याची सोय सरकारनं त्वरित करावी. आम्ही या कामगारांना, मजुरांना वाऱ्यावर सोडणार नाही. यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा आंदोलन करु.
लॉकडाऊनमुळे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात अनेक ठिकाणी राज्यातील मजूर कामगार अडकले आहेत. त्यांच्या जवळील पैसा आणि अन्नधान्य संपलं आहे. अशाही परिस्थितीत ते हजारो मैल पायपीट करत आहे. सरकार देशातील नागरिकांना परदेशातून विमानानं मायदेशात आणत आहे. तर राज्यातील परप्रांतीयांना रेल्वे आणि बसने पाठवत आहे. मग राज्यातील मजुरांना, कामगारांना ही सवतीची भूमिका का?
या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी. अन्यथा परप्रांतीय मजुरांप्रमाणे राज्यातील मजूरांचा प्रश्न ही गंभीर बनेल, मजूर गावात आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्वारटांईन करुन ठेवा, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

