Share

सचिन वाझेच्या ‘या’ वक्तव्यामुळे परमबीरसिंग अडचणीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या चौकशीत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

चांदीवाल समितीने केलेल्या चौकशीत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी, मी एक छोटा प्यादा असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. यावरून या सर्व प्रकरणातील मोठे लोक कोण असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. त्यातच आता बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत ज्यामुळे आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हे चांगलेच अडचणीत आले आहते.

परमबीरसिंह यांनी देशमुखांवर आरोप करणारे पत्र लिहिले होते. तेच आता पत्रातील आरोप ऐकीव माहितीच्या आधारे केल्याचे म्हटले आहे. मूळ आरोप करणारेच असे म्हणत असतील तर चौकशी इथेच थांबायला हवा. चौकशी करायची असेल तर आधी परमबीरसिंहांची करावी. माझी उलटतपासणी घेण्याची गरज नाही, असे वक्तव्य बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केले आहे. माजी पोळस आयुक्त परमबीर सिंग यांनी ऐकीव माहितीच्या आधारे आरोप केले असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!