Share

चुरस वाढली : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सचिन सावंतांचे नाव आघाडीवर

Published On: 

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातचं आता कॉंग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत यांचे नावं आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. यावर खुद्द सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, मी गेली 25 वर्ष काँगेसच्या विचारांचा पुरस्कार करत कार्यकर्ता म्हणून काम करतोय.पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडण हे प्रथम कर्तव्य मानतो. कोणती जबाबदारी कोणाला देयची हे पक्ष ठरवेल. त्यामुळे मला पक्ष जी जबाबदारी ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल.

तसेच विधान परिषदेची निवडणूक ही राजकीय अपरिहार्यतेतून होत आहे. अशी निवडणूक होऊ नये यासाठी महाविकास आघडी कडून प्रयत्न होत होते. राज्यपालांच्या नामनिर्देशनान मुख्यमंत्र्यांची आमदार म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी आम्ही करत होतो. मात्र आता ही निवडणूक अपरिहार्य झाली आहे. कारण राज्यावर आता कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे या संकटकाळात  सरकार स्थिर राहण गरजेचे आहे. मात्र अशा परिस्थितीत काहीजण अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने याला सामंजस्यानंं सामोरंं जावं, असे सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्यानं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल, अशी चिन्हं आहेत. भाजपने तसे संकेत आधीच दिले आहेत. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सहा जागा निवडून येतील, असा दावा केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!