मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.
‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याच मुद्द्यावरून फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, कल्पनेतही नसताना मविआ सरकार स्थापन झाले हा झटका मोठा होता याची जाणीव आहे. मानसिक धक्क्यातून अनेकदा अशा प्रकारची लक्षणे उद्भवू शकतात. रक्तात मीठाचे प्रमाण कमी झाले तरी असे भ्रम होतात म्हणे! लवकरात लवकर डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. आधीच दोन वर्षे अंगावर काढली आहेत, काळजी घ्यावी! असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची करडी नजर?; पुराव्यासह केला आरोप
- ‘जर धोनी भाई खेळत नसेल तर…’, सुरेश रैनाचा आयपीएल निवृत्ती योजनेबद्दल मोठा खुलासा
- आरसीबी फक्त 10 खेळाडूंसह खेळत होता; परभावानंतर सेहवाची संघावर टीका
- ‘घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करत वीज बचत करून महावितरणला सहकार्य करा’
- ‘हा प्रश्न मला विचारू नका’ म्हणत चालू मुलाखतीतून माईक फेकून मलिक निघून गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

