Share

मराठा आरक्षणाचा अजेंडा आणि आश्वासन काँग्रेसचेचं होते – सचिन सावंत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाचा अजेंडा व आश्वासन काँग्रेसचेच असल्याचे भाष्य केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ तर नौकरीत १३ टक्के आरक्षणाला मान्यता दिली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याकरिता राणे समिती डिसेंबर २०१२ ला स्थापन केली होती. असे सचिन सावंत यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर समिती स्थापन झाल्यानंतर समितीने अहवाल दिल्यानंतर २०१४ जूलै महिन्यात अध्यादेश काढला होता, असेही सावंत यांनी म्हंटले.

याचबरोबर अध्यादेश काढेपर्यंत भाजपा किंवा शिवसेनेने कधीच मराठा आरक्षणाची मागणी केली नव्हती. त्यामुळे हा अजेंडा आणि आश्वासन काँग्रेसचेच होते, असे सचिन सावंत यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!