🕒 1 min read
मुंबई : कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्यपाल भागतसिंग कोश्यारी यांनी डोक्यावरची टोपी काढून विचार करावा असे ट्विट केले होते. यावर आता अँँड. विवेकानंद गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे. तर मुंबई पोलीस कमिशनर यांना पत्र लिहित सचिन सावंत यांच्यावर FIR दाखल करावी अशी मागणी केली आहे.
विवेकानंद गुप्ता यांनी एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी याबाबत स्पष्टीकारण दिले आहे. ते म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीच्या पेहराव्या विषयी भाष्य करणे चुकीचे आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी टोपी घालतात ती उत्तराखंड राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. तिथला तो स्थानिक पोषख आहे. त्यामुळे यावर सचिन सावंत यांनी जे विधान केले आहे. ते बेताल वक्तव्यांपैकी एक आहे. त्यामुळे मी मुंबई पोलीस कमिशनर यांना सचिन सावंत यांच्यावर FIR दाखल करावी अशी विनंती केली आहे.
Hope @CPMumbaiPolice
will lodge FIR immediately against @sachin_inc for his derogatory tweet against @maha_governor about his cap, which is a cultural symbol of Uttarakhand. @alok_bhatt @jitengajaria @AdvaitaKala @bhootnath @dhaval241086 @mirchagalib @republic @MeghaSPrasad pic.twitter.com/N5zhz0Fsjl— Adv.Vivekanand Gupta ???????? (@vivekanandg) April 30, 2020
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2564496440469674/
सचिन सावंत यांनी ट्विट करून थेट राज्यपालांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ते म्हणतात, महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोपी काढून विचार केला तर निश्चितपणे त्यांना आपल्या जबाबदारीची आठवण होईल आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नियुक्ती करतील. ही टोपीच घटनात्मक जबाबदारीच्या आड येत आहे.
दरम्यान, काळी टोपी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पोशाखाच भाग आहे. नेमका हाच मुद्दा उचलत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला असावा. सोबत त्यांनी हि टोपी काढून ठेवली तर जबाबदारीची आठवण येईल असेही म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

