Share

सासरे फारुख अब्दुल्ला यांच्या सुटकेनंतर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणतात…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७०ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. तसेच महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली. मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांना सरकारने स्थानबद्ध केलं होतं . कलम ३७० रद्द करणे आणि काश्मीरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली होती.

अखेर सात महिन्यांनंतर जम्मू-काश्मीर सरकारने नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर सार्वजनिक सुरक्षितता कायदा १९७८ नुसार नजरकैद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरचे प्रमुख योजना सचिव रोहित कन्साल यांनी आपल्या टि्वटर हँडलवरुन फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद संपुष्टात आल्याच्या आदेशाची प्रत शेअर केली आहे.

यानंतर राजस्थानचे कॉंग्रेस नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ट्वीट करत फारूख अब्दुल्ला यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पायलट हे फारूख अब्दुल्ला यांचे जावई आहेत. फारूख अब्दुल्ला यांची मुलगी सारा पायलट यांचा सचिन पायलट यांच्याशी प्रेम विवाह झाला आहे.

दरम्यान सचिन पायलट यांनी आपले मेहुणे आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि दुसऱ्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचीही लवकरच सुटका होईल अशी अशा व्यक्त केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!