टीम महाराष्ट्र देशा – जगभरात कोरोनाच थैमान सुरूच आहे आणि या आजारावर ज्या औषधांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे तत्यांच्या निर्मितीत भारताची हुकुमत आहे. त्यामुळेच भारतच महत्व आता अडचणीत सापडलेल्या संपूर्ण जगासाठी कैक पटींनी वाढलं आहे.
आता करोनाशी मुकाबला करण्यासाठी आम्हाला भारताने जी मदत केली त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं म्हणत रशियाने भारताचे आभार मानले आहेत. करोनासोबत लढा देण्यासाठी भारताने जी औषधं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तो महत्त्वाचा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते यांनी भारताच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
रशियात करोनाचे ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर २७० पेक्षा जास्त रुग्णांचा करोनाची लागण झाल्याने बळी गेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत भारताने केलेली मदत महत्त्वाची आहे. त्यामुळेच रशियाने भारताचे आभार मानले आहे. सध्या सगळं जग करोनाशी लढा देतं आहे. अशात परिस्थितीही भारताने आम्हाला मदत केली हे महत्त्वाचे आहे असंही रशियाने म्हटलं आहे.
"Russia is grateful to India for decision to supply medicines to fight COVID19. We regard this decision of India as an effective step towards implementing agreements on cooperation in the fight against COVID19,"Russian President Putin’s Spokesperson: Embassy of India in Russia pic.twitter.com/l8SQJZDpPY
— ANI (@ANI) April 17, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

