नवी दिल्ली : अम्फान वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. तर अनेकजण मृत्युमुखी पडले असून मोठे नुकसान झाले आहे. यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनेर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहणी करण्यासाठी येण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपत्तीग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालला १००० कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच ओडीशाला देखील ५०० कोटींचा आधार देणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री मराज्याला १००० कोटी रुपये देण्याची घोषणा करीत आहे. याशिवाय कृषी, वीज आणि अन्य क्षेत्रातील नुकसानीची महिती घेतली जाईल. मता बॅनर्जी यांच्यासोबत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागाची हवाई पाहणी केली, तर या राज्याच्या पाहणीसाठी आता केंद्रीय पथक जाणार आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या बशीरहाटमध्ये धनखड, ममता बॅनर्जी आणि राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासह एका बैठकीत मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्याला १००० कोटी रुपये देण्याची घोषणा करीत आहे. याशिवाय कृषी, वीज आणि अन्य क्षेत्रातील नुकसानीची महिती घेतली जाईल. तसेच राज्यातील नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्र एक पथक तैनात करील.एकीकडे कोरोनाचा सामना करीत असताना नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले.
ओडिशा मदत
अॅम्फन वादळाचा मोठा फटका बसलेल्या ओडिशा राज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ५०० कोटी रुपयांचे आगाऊ आर्थिक साह्य जाहीर केले. वादळाचा फटका बसलेल्या भागाची मोदी यांनी हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या
#महाराष्ट्र_बचाओ : संजय राऊतांनी भाजपाच्या निदर्शनांची खिल्ली उडवली, म्हणाले…
‘या मातीशी बेईमानी करणाऱ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही, हा महाराष्ट्र द्रोह लक्षात राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

