Share

रोहित पवारांनी मानले राज्यसरकारचे आभार

Published On: 

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. पुण्यात आणखी 3 रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 101 वर गेला आहे.राज्यात कोरोनाबधितांची संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
‘राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी तज्ज्ञांनी व काही अनुभवी व्यक्तींनी सुचविल्या आहेत. हा निर्णय घेतल्याबद्दल @mygovindia चे मनःपूर्वक आभार! लोकप्रतिनिधी व तज्ज्ञांच्या मागणीनुसार आणि WHO च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लक्षणे असलेले व संशयित अशा सर्वांचीच तपासणी करावी. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल.’ असे ट्विट करत रोहित पवार यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.

दरम्यान, दि इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी भारतात कोरोना चाचणी बाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. मात्र भारतात अद्याप कोरोनाचा सामुहिक प्रसार झाला नसल्याचे म्हटले आहे. परदेशात न गेलेल्या पण फ्लू सारखी लक्षणे असणाऱ्या सर्वांचे नमुने चाचणीसाठी घेण्याच्या प्रक्रियेला वेग दिला जाईल, असे त्यात म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!