Eknath Khadse | मुंबई : अवैध फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला मागील दोन वर्षे चर्चेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप केल्याचे त्यांच्यावर आरोप होते. याप्रकरणी राज्य सरकारकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या विरोधात खटला चालविण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. फोन टॅपिंग ज्या कालावधीत झालं, त्यावेळी राज्यात निवडणुका होत्या. त्यामुळे हे संभाषण कोणालातरी पुरवण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. यामागे नेमका कोणाचा हेतू होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या गोष्टीचा तपास होणं गरजेचं असल्याचं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. “अलीकडच्या काळात जेव्हा रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांना भेटल्या. त्यावेळी मला संशय आला होता. त्यांना क्लिनचिट मिळणार, अशी मला खात्री होती आणि तसेच घडले”, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले, “रश्मी शुक्ला यांनी निवडणुकीच्या दरम्यान ६८ दिवस माझा फोन टॅप केला, असा एक दावा होता. त्यावेळी रश्मी शुक्ला संबंधित विभागाच्या अधिकारी होत्या. माझा फोन कशासाठी टॅप करण्यात आला? त्यातून नेमकं काय साध्य झालं? फोन टॅपिंग कोणाच्या सुचनेनुसार झालं? कोणाला त्याचा फायदा झाला? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरीत असल्याचं खडसे यावेळी बोलताना म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च २०२१ मध्ये समाजमाध्यमांवर व्हायरला झाला होता. रश्मी शुक्ला यांच्या या अहवालातील तपशील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले होते. तसेच त्याआधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे रश्मी शुक्ला यांनी कोणत्याही परवानगीशिवाय फोन टॅपिंग केले असल्याचे मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) पुरावे होते. तरी देखील ही केस बंद झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rashmi Shukla । रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्यसरकारचा मोठा निर्णय
- Maharashtra Rain Update | आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्यापासून उघडीप होण्याची शक्यता
- Arvind Sawant | “मग तेव्हा तमाशा का करता?”; देवेंद्र फडणीसांच्या ‘त्या’ वक्तव्याला अरविंद सांवतांनी दिले प्रत्युत्तर
- Corona Alert | “कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते “; WHO चा इशारा
- Ramdas Athavle | शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, रामदास आठवले म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

