नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर देत सीतेच्या नेपाळमध्ये आणि रावणाच्या लंकेत श्रीरामाच्या भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त असल्याचे दाखवून दिले होते. ‘पेट्रोलचा दर रामाच्या भारतात ९३, सीतेच्या नेपालमध्ये ५३ तर रावणाच्या श्रीलंकेत ५१ आहे’ अशा आशयाचे ट्वीट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला चिमटा काढला होता.
दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जनतेच्या मते वाढत्या किंमती या त्याचे शोषण करणारी आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलवरून लेव्ही हटवायला हवा’, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
स्वामी म्हणाले की, लोकांचा आवाज कधीतरी स्पष्ट आणि मोठा होतो. कधी कधी असे होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून एकसारखा मतप्रवाह आहे. इंधनाच्या वाढत्या किंमती शोषण करणाऱ्या आहेत. यामुळे सरकारने कर हटवायला हवेत’, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटलंय.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

