चेन्नई : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये भारतीय संघाला आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून देणाऱ्या रिषभ पंत याचा बोलबाला इंग्लंड संघाविरुद्धही दिसून आला. रिषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ताबडतोड फलंदाजी केली. त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन, संघ संकटात असताना अवघ्या ४० चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले.
इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या पहिल्या कसोटीत त्याने शानदार डाव खेळला मात्र, चाहत्यांमध्ये पंतबाबत दुसऱ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे ज्यामुळे आता त्याची मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना होत आहे. पंतने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पहिल्या डावात शानदार डाव खेळला पण 91 धावांवर डोम बेसच्या चेंडूवर कॅच आऊट झाला आणि फक्त 9 धावांनी त्याचे टेस्ट शतक हुकले. ऑस्ट्रेलियामध्येही जेव्हा सिडनी कसोटी सामन्यात तो 97 धावांवर माघारी परतला होता. इतकंच नाही तर यापूर्वीही तो मोठा डाव खेळण्यास अपयशी ठरला आहे.
पंत इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 91 धावांवर माघारी परतला दुसरीकडे, त्याची सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी तुलना सुरु झाली. आणि ही तुलना सचिनच्या शानदार रेकॉर्डबाबत नसून एका अनपेक्षित विक्रमाशी होती. आपल्या कारकीर्दीत सचिन 90 हुन अधिकच्या धावसंख्येवर बाद झाल्यामुळे बर्याच वेळा चर्चेत राहिला होता. मास्टर-ब्लास्टर तब्बल 28 वेळा ‘नर्व्हस 90’चा शिकार बनला आहे. तर रिषभ पंतही चौथ्यांदा नव्वदीपार शतक पूर्ण करण्यापासून काही धावांपूर्वी बाद झाला आहे. हे लक्षात येताच यूजर्सने अशा प्रतिक्रिया दिल्या.
I feel Rishabh Pant will break Sachin's record of getting out in nervous 90s!#INDvsENG
— Rushang Buch (@BuchRushang) February 7, 2021
Sachin Tendulkar has passed on the mantle of batting responsibility to many people like Kohli, Rohit etc but the nervous 90's heir goes to Rishabh Pant.@sachin_rt @RishabhPant17#INDvENG
— Arvind Ramachander ???? (@arvindia4u) February 7, 2021
#INDvENG#INDvsENG
* Rishabh Pant continuously getting out in nervous 90s *Sachin Tendulkar : pic.twitter.com/MTfN65HOPc
— aman (@bilateral_bully) February 7, 2021
Rishabh Pant is basically a mixture of Sachin and Sehwag. One gets out in 90s and other tries to hit in 90s#RP17 #INDvENG
— Mohit Katta (@MohitKattaC1733) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- ‘हिमालय संवेदनशील स्थान आहे तेथे जलविद्युत प्रकल्प उभारायला नको होते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

