पुणे : पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. मात्र पुणे शहरात क्षेत्रफळालाच्या तुलनेनं सार्वजनिक वाहतूक एवढी सक्षम नाही. पीएमपीएल आणि सार्वजनिक रिक्षा हे दोनच पर्याय पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत.
त्यातच आज हडपसर भागातील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारल्याने हडपसर येथील रहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात ‘रॅपीडो’ अॅपद्वारे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू केल्याने हडपसरमधील मगरपट्टा परिसरात रिक्षा संघटनेनं अचानक बंद पुकारला. तसंच सकाळपासून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षा अडवून आतील प्रवासी खाली उतरवण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हडपसर येथील मगरपट्टा चौकात सकाळी आंदोलन सुरु झाल्यावर रिक्षा चालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सकाळी कामाच्या वेळीच रिक्षा चालकांनी कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे अनेक प्रवाश्यांचे हाल झाल्याने, प्रवाश्यांनी लगेच पोलीस कंट्रोल रूमला कॉल लावत; पोलिसांना या हडपसर मधील रिक्षा चालकांच्या काम बंद आंदोलनाची माहिती दिली. पुणे वाहतूक पोलिसांनी लगेच आंदोलन करत असलेल्या ठिकाणी धाव घेत आंदोलनकारी रिक्षा चालकांना खडे बोल सुनावले आणि त्वरित ही आंदोलन बंद करण्यास सांगिलते. तुम्हाला प्रवाश्यांना रिक्षामधून खाली उतरवण्याचा कोणताही अधीकार नाही अश्या कडक शब्दात पुणे वाहतूक पोलिसांनी सुनावल्यावर हडपसर येथील रिक्षा चालकांनी लगेच आपले आंदोलन थांबवले.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
- “महाराष्ट्राच्या बदनामीच काय…”; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- ‘गोव्यात बेरोजगारी वाढण्यास भाजप जबाबदार’; नवाब मलिकांचा आरोप
- मोठी बातमी! हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

