Share

‘महसूलमंत्र्यांनीच वाळू माफिया निर्माण केलेत’ ; बाळासाहेब थोरातांवर गंभीर आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – अहमदनगर जिल्ह्यातील थोरात – विखे या दोन बड्या राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष नवा नाही. यातच आता माजी विरोधीपक्ष नेते आणि आता भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

‘आपल्या बगल बच्च्यांना पाठीशी घालण्याचं काम महसूलमंत्री करत आहेत. महसूलमंत्र्यांनीच वाळू माफिया निर्माण केलेत’ अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.

‘राज्यात महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होत असताना महसूलमंत्री गप्प का?, असा सवाल उपस्थित करत आपल्या बगल बच्च्यांना पाठीशी घालण्याचं काम महसूलमंत्री करत असून त्यांच्या मतदारसंघात वाळू माफियांचे वर्चस्व आहे.

तसेच महसूलमंत्र्यांनीच वाळू माफीया निर्माण केलेत, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातील वाळू तस्करांवर मोक्का लावा, अशी मागणीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!