मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील चौकशी सुरू केली. त्याअंतर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केली आहे. मात्र अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी झालेली नाही. ‘ईडी’ने त्यांना आत्तापर्यंत पाच वेळा समन्स बजावले. पण देशमुख एकदाही समोर आलेले नाहीत.
दरम्यान आज मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं स्टेटमेंट सचिन वाझेनं ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध दर्शवला होता. शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते. जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब नाराज होते आणि त्यांनी आदेश माघारी घेतला होता, असे वाझेने सांगितले असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी पुन्हा’ यशस्वी करण्यासाठी खुद्द अजित पवार मैदानात !
- राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
- ‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील

